Sunday, May 14, 2023

सोडून द्यावं

 *सोडून द्यावं...*


एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल

तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं.


ऐकूनही न ऐकल्यासारखं करत असतील 

तर उगाचंच संवाद साधणं सोडून द्यावं.


आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर

इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं.


ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं 

तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं.


प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं

म्हणूनच म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं.


आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर

रोज जमाखर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं.

- unknown