मिठीत जाऊन तुझ्या मिटावे या पलीकडले नकोच काही...
काय करावे या द्वाड मनाचे असेच बरळतो बाकी काही नाही..
जा रे तु लबाड कान्हा, सोंग हे का मज कळत नाही??
रास तुझा, अन् गोपिका भोवती.. मन राधेचे लाही लाही..!!
सांज ओसरत, दिवा उजळत, मृगजळ स्वप्न वाहत जाई..
थेंब मोत्याचा अधर पाकळी, पाखरा सम मन बहरत जाई..!!
कसे मिळावे? कसे कळावे? जीवास वेड्या सारे काही..
लाज वाटते जनास साऱ्या, या मनास वेड्या तीही नाही..!!
सारे कळते, सारे वळते, रंगवेडा-इंद्रधनु मी अजाण नाही..
काय करावे या द्वाड मनाचे, असेच बरळतो काही बाही..!!
- रंगवेडा, Bshan ❣️