Monday, May 15, 2023

काय रे मना

काय रे मना? काय बहरले? की रूप साजे हृदयात उतरले?

नयन पाकळी स्थिर झाली, मग चित्त पाखरू कसे आवरले?


गार वारा, अन् पाऊस धारा, चिंब भिजुनी अंग अंग शहारले!

ओल्या मातीस् गंध आला, रंगवेड्या वाटे सारे प्रीतीत घडले!


पहिल्या सरीचा स्पर्श होता, जे तुझे होते, ते तुझेच न उरले!

बांधील आहे हृदयात प्रेम, की, सरी सकट सारे वाहुन गेले?


तोल जाता हळव्या मनाचा, निसटे मन ते अलगद निसटले!

जीव ही निघाला त्याच दिशेने, त्यास कसे बसे मी सावरले!


काय रे जीवा? काय हरवले? की पाहता क्षणी मन बहरले?

दुनिया सारी स्थिर झाली, मग भटकते भान कसे आवरले?


- रंगवेडा bshan 💕